youth hits vada pav seller at ulhasnagar railway station Saam Digital
क्राईम

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विक्रेत्याला भाेसकले, युवकावर गुन्हा दाखल

या घटनेचा तपास सुरु असल्याचे विठ्ठलवाडी पाेलिसांनी सांगितले.

Siddharth Latkar

- अजय दुधाणे / संजय राठाेड

Ulhasnagar News :

उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ एका वडापाव विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या कारणावारुन एका युवकाने वडा पाव विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचा तपास सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रमेश गुप्ता असे जखमी वडापाव विक्रेत्याचे नाव आहे. गुप्ता यास उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस तपास करीत आहेत.

गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा युवक हा उल्हासनगर रेल्वे स्थानकावर असलेल्या स्कायवॉक येथे मादक पदार्थांची नशा करत असतो अशी माहिती समोर आली आहे. गुप्ता यास युवकाने पैसे मागितले हाेते. त्याने पैसे नकार दिल्याने युवकाने त्यास भाेसकल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस तपास करीत आहेत.

यवतमाळच्या शासकीय गाेदामात चाेरी

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या कार्यशाळेचे गोदाम पडून चोरट्यांनी चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय माहिती काढून आरोपींचा शोध सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तब्बल आठ जणांच्या टोळीने हा ऐवज लंपास केल्याचे समाेर आले आहे. या सर्वांना पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT