youth arrested for hitting brother in selu Saam Digital
क्राईम

Parbhani Crime News : परभणी हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

Parbhani Marathi News : या घटनेनंतर पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

राजेश काटकर

Parbhani :

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेत जमीनच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करुन खून केल्याची घटना साेमवारी रात्री घडली. मधुकर मारोतराव मगर (वय ३८, रा.मोरेगाव) असे मृताचे नाव असून राजेभाऊ उर्फ अशोक मगर यास पाेलिसांनी अटक केल्याची माहिती साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वर मंदीरात जेवणाची पंगत चालू असताना ही घटना घडली. याप्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर (वय ३१) यांनी फिर्याद दिली‌. संशयित आरोपी राजेभाऊ याने मृताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीच्या डाव्या बाजुस चाकुने हल्ला करुन त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

पाेलिसांनी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर (वय ४३ रा. मोरेगाव) याच्यावर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता, अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनंतर पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT