yavatmal police charged four from sambhajinagar sml80  Saam tv
क्राईम

Yavatmal Crime News : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील चौघांवर यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

हा प्रकार 26 डिसेंबर 2006 ते सात सप्टेंबर 2011 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal :

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पंढरीनाथ घुगे, जयदीप घुगे, अरमदीप घुगे आणि प्रदीप घुगे (सर्व राहणार कुशलनगर, छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार बेंबळा मुख्य कालवा मातीकाम व बांधकामाच्या निविदेत कंत्राटदार कंपनीने पूर्वअर्हता कागदपत्र सोबत एकूण दोन बनावट कार्यपूर्ण व पूर्व अनुभव प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार एसीबीने दिली. त्यानूसार अवधूतवाडी पाेलिसांनी कार्यवाही केली.

हा प्रकार 26 डिसेंबर 2006 ते सात सप्टेंबर 2011 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात घुगे अँड कंपनीच्या भागीदारांबाबत तक्रार दिली. (Maharashtra News)

त्यानूसार घुगे अँड कंपनीच्या पंढरीनाथ घुगे, जयदीप घुगे, अरमदीप घुगे आणि प्रदीप घुगे (सर्व राहणार कुशलनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT