Maharashtra Latest News: Saamtv
क्राईम

Yavatmal Crime News: पैशाच्या वादातून भयंकर कांड.. भररस्त्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या; यवतमाळ हादरलं

Maharashtra Latest News: पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास राळेगांव पोलीस तपास करीत आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

संजय राठोड| यवतमाळ, ६ जून २०२४

चाकूने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धारदार शस्त्राने सहा ते सात वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव येथील बस स्थानकासमोर घडली. छोटू ओंकार असे मृतकाचे नाव असून पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत तरुण छोटू ओंकार बसस्थानकासमोरील मोबाईल शॉप जवळून जात असताना अज्ञात आरोपीने चाकूने मानेवर आणि पोटावर वार केले.

या हल्ल्यात छोटू ओंकार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास राळेगांव पोलीस तपास करीत आहे. भरवस्तीत झालेल्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या छापेमारीत पोलिसांनी 4 टँकर, 75 गॅस टाकीसह रिफिलिंग चे साहित्य असा एकूण 1 कोटी 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी एकूण 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT