Yavatmal Zilla Parishad Principal was Beaten Saam Tv News
क्राईम

Yavatmal Crime : महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकाला जबर मारहाण, दुचाकीही पेटवली; कारण काय?

Yavatmal Zilla Parishad Principal was Beaten : महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर काही पालकांनी संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक करतात, असभ्य भाषेत बोलत असल्याचं सांगत वाद घातला होता.

Prashant Patil

यवतमाळ : जिल्ह्याच्या यवतमाळ तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर या मुख्याध्यापकाची दुचाकी देखील पेटवून देण्यात आल्याने गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केल. पुरुषोत्तम मंडलिक असे या मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेतलं होतं.

महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर काही पालकांनी संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक करतात, असभ्य भाषेत बोलत असल्याचं सांगत वाद घातला होता. त्यावेळी, बघता-बघता मोठा जमाव शाळेत पोहोचला आणि मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याध्यापकाला जमावाच्या तावडीतून सोडवलं. मात्र, संतप्त जमावाने मुख्याध्यापकाची दुचाकी जाळून टाकली, त्यात गाडी जळून खाक झाली आहे. या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल झाली नसून, पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पालकांनी या संदर्भात कुठलीच तक्रार केली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

यवतमाळच्या पिंपळगाव येथे लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रमोद पेंदोरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्येची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली असून, लोखंडी रॉडने आरोपी कवीश्वर हा आपल्या सख्ख्या मोठा भाऊ प्रमोदला भर वर्दळीच्या रस्त्यात मारताना दिसत आहे. यावेळी शेजारूनच अनेक नागरिक ये-जा करीत असले तरी कुणीही मदतीला धावताना दिसत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, घटनेतील आरोपीाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कौटुंबिक वादातून लहान भावाने लोखंडी रॉडने मोठ्या भावाच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव येथे घडली. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रमोद पंढरीनाथ दिंडोरे (वय ३५, रा. तिरुपती नगर पिंपळगाव) असं मृतकाचं नाव आहे. तर कवीश्वर पंढरी पेंदोरे (वय ३४, रा. तिरुपती नगर पिंपळगाव) असं आरोपी भावाचं नाव आहे. मृतक प्रमोद याने २०१७मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तो भाड्याने रूम करून राहत होता. आई-वडिलांना भेटून परतीच्या मार्गावर असताना सायंकाळी पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालयाजवळ लहान भाऊ प्रमोद याने लोखंडी रॉडने सपासप वार करून ठार केलं. दरम्यान, घटनेतील आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT