Woman assault India Saam Tv
क्राईम

Crime news: स्मशानात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, २ तास डांबून ठेवल्यानंतर नराधमांच्या तावडीतून केली सुटका

Woman assault India: हरियाणातील नूंह जिल्ह्यात महिलेसोबत अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपीने फसवून निर्जन ठिकाणी नेऊन गुन्हा केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हरियाणातील नूंह जिल्ह्यातील एका गावात महिलेसोबत अत्याचाराची गंभीर घटना समोर आलीये. यावेळी आरोपीने स्मशानभूमीमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पिनगवां पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या बहिणीचे लग्न नूंह तालुक्यातील एका गावात झाले आहे. त्यामुळे ती बरेचदा बहिणीच्या सासरी येत-जात होती. याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीशी तिची ओळख झाली होती.

आरोपीने केला फोन

या पिडीत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने तिला फोन करून तिच्या बहिणीकडून काही सामान आणल्याचं सांगितलं होतं. यावेळी ते सामान देण्यासाठी तिला स्मशानभूमीजवळ येण्यास सांगितलं. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली.

जबरदस्तीने केले लैंगिक अत्याचार

त्यानंतर आरोपीने तिला बहाण्याने जवळच असलेल्या झाडांमध्ये नेलं. त्याठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. यावेळी विरोध केल्यावर आरोपीने तिच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर आरोपीसह त्याच्या इतर साथीदारांनी तिला सुमारे दोन तास तिथेच बंधक बनवून ठेवलं होतं, असंही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकी दिली की, जर तिने ही गोष्ट कुणाला सांगितली तर तिला जीवे मारून टाकलं जाईल. कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर ती घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

कुटुंबियांनी तातडीने घेतली पोलिसात धाव

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

SCROLL FOR NEXT