Uttar Pradesh Crime Saam Tv News
क्राईम

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या हाथसरमध्ये विवाहित महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केला. मूल होत नसल्यामुळे या महिलेला तिचा नवरा आणि नणंद मांत्रिकाकडे घेऊन गेली होती. तेव्हा मांत्रिकाने तिच्यासोबत हे धक्कादायक कृत्य केले.

Priya More

लग्नाच्या ३ वर्षे होऊनही मूल होत नाही त्यामुळे तरुण आपल्या बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला. या महिलेवर मांत्रिकानेच बलात्कार केला. तांत्रिकाने लिंबू कापण्याच्या बहाण्याने महिलेला शेतात नेले आणि तिथेच तिच्यावर त्याने बलात्कार केला. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर मांत्रिकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस जिल्ह्यातील २२ वर्षीय महिलेचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते. लग्नाला ३ वर्षे होऊन देखील मूल झाले नसल्याने ती नाराज होती. चिंतेत असलेल्या महिलेने आपल्या नणदेला याबाबत सांगितले. तिने या महिलेला नरखी येथील मुनियाखेडा गावातील रहिवासी भगत चंद्रपाल सिंह यांच्याकडून भूतबाधा करून घेण्यास सांगितले. ५ जुलै रोजी या महिलेला तिचा नवरा आणि नणंद मांत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकाने त्यांना १२ जुलै रोजी पुन्हा येण्यास सांगितले.

सांगितल्याप्रमाणे १२ जुलै रोजी ते तिघे मांत्रिकाला भेटण्यासाठी मुनियाखेडा गावातील मंदिरात गेले. मांत्रिकाने महिलेला शेतात लाडू पुरण्याचा आणि लिंबू कापण्याचा सल्ला दिला. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा पती मंदिराबाहेर असताना तांत्रिकाने तिच्या नणदेला काही वस्तू आणण्यासाठी पाठवले. यानंतर मांत्रिकाने पीडितेला लाडू पुरण्याचा आणि लिंबू कापण्याचा बहाण्याने मंदिरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या खोलीजवळील शेतातील एका खड्ड्यात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.

या पीडित महिलेची नणद मूल होत नसल्याने सहा वर्षांपूर्वी मांत्रिकाकडे गेली होती. त्यानंतर ती आई झाली होती. त्यामुळे तिने पीडित महिलेला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. पीडितेच्या तक्रारीवरून मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीला आरोपीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला पण वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर कलम वाढवण्यात आले. आरोपी मांत्रिकाला पोलिसांनी रविवारी सकाळी मंदिराजवळून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Maharashtra News Live Update: पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT