Bhandara crime, wife stabs husband  Saam TV Marathi News
क्राईम

धक्कादायक! भंडाऱ्यात बायकोनं नवऱ्यावर केला चाकूने वार, कारण वाचून तुम्हीही चक्रावून जाल; त्या रात्री काय घडलं?

Bhandara crime, wife stabs husband : भंडाऱ्यातील नाकाडोंगरी येथे किरकोळ कारणावरून पत्नीने आपल्या पतीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

wife stabs husband in Bhandara over movie argument : संसार म्हटला की वाद-विवाह हे ओघाने आलेच, पण हाच वाद रक्ताच्या थारोळ्यापर्यंत जाईल असा कुणी विचारही करत नाही. पण भंडाऱ्यात एका किरकोळ कारणावरून एका पत्नीने आपल्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "पिक्चर पाहताना माझ्या शेजारी का बसला नाही?" याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या पत्नीने आपल्याच कुंकवावर चाकूने वार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नवरा-बायकोमध्ये त्या रात्री जे घडलं त्याने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे.

चित्रपटाचा वाद रक्ताच्या थारोळ्यात

चित्रपट पाहताना सोबत का बसला नाही? या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यातील नाकाडोंगरी येथे घडली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आशिष शंकर मिश्रा यांनी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

भाजी कापण्याच्या चाकूने भोसकले

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शंकर मिश्रा (वय ३९, रा. नाकाडोंगरी) आणि त्यांची पत्नी शिवानी मिश्रा यांच्यात वाद झाला. फिर्यादी घरात कपडे बदलत असताना, पत्नीने "तू मला चित्रपट पाहायला नेले, पण तिथे माझ्यासोबत का बसला नाही?" असा जाब विचारत भांडणास सुरुवात केली. वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांचे केस ओढले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता, घरातील भाजी कापण्याचा चाकू घेऊन ती पतीच्या अंगावर धावून आली. आशिषने स्वतःचा बचाव करण्यासाठी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण चाकूचा वार त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराच्या वर लागला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला जखम होऊन रक्तस्त्राव झाला.

नवऱ्याची बायकोविरोधात पोलीसांत तक्रार -

आशिषने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांना "भावाच्या हातून उडवून देण्याची" धमकी देखील दिली आहे. या घटनेनंतर आशिष मिश्रा यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या जबाबावरून गोबरवाही पोलिसांनी आरोपी शिवानी मिश्रा हिच्याविरुद्ध कलम ११८ (१), ३५२ आणि ३५१ (२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

Bridal Makeup Tips at Home: घरीच करा ट्राय करा सुंदर ब्रायडल मेकअप, या ७ सोप्या टिप्सने मिळवा परफेक्ट ब्रायडल लूक

Eyebrow Shape Tips: आयब्रो केल्यानंतर २ दिवसांत लगेचच बदलतो शेप; या 5 सोप्या मेकअप टिप्स लगेचच करा फॉलो

Lockdown: शाळा-कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना WFH; भारताशेजारील देशात लॉकडाउन

धक्कादायक! नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला कपडे फाटेपर्यंत मारले, ७-८ जणांनी खाकीवर उचलला हात, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT