Kolkata Assault Case Saam Tv News
क्राईम

जबरदस्तीने शारीरिक संबंध, शरीरावर चाव्याचे-नखांचे व्रण; कोलकाता तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

Kolkata Assault Case : पश्चिम बंगालमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची एक भयानक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांसह आणि एका माजी विद्यार्थ्यासह तीन जणांना अटक केली आहे.

Prashant Patil

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची एक भयानक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांसह आणि एका माजी विद्यार्थ्यासह तीन जणांना अटक केली आहे. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते १०.५० दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, शरीरावर चाव्याचे आणि नखांचे व्रण आढळून आले आहेत. मुख्य आरोपी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून तो वकिली करतो, त्याने अत्याचार केला आणि तर इतर दोघे बाहेर पहारा देत होते, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा आणि संयुक्त सीपी रूपेश कुमार यांनी कसबा पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासकार्याची पाहणी केली. त्यांनी साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजला भेट देऊन प्रकरणाची सखोल चौकशी केली.

राज्य सरकारनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पंजा यांनी सांगितलं की, 'पोलिसांना तक्रार मिळताच १२ तासांच्या आत तीनही आरोपींना अटक करण्यात आली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. राज्य सरकार आणि पोलीस हे प्रकरण खूप गांभीर्यानं घेत आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कोणतेही राजकारण होऊ नये', असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, आरोपींचा कोणतंही नाव, धर्म, जात किंवा संघटना असली तरीही कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्या आरोपींना टीएमसी छात्र परिषदेशी जोडलं जात आहे ते सध्या कोणत्याही अधिकृत संघटनेशी संबंधित नाहीत', असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT