West Bengal Crime Saam Tv
क्राईम

Crime: झोप मोड झाल्याने तरुणाची सटकली, घरात बोलावून ४ मुलींवर कोयत्याने सपासप वार; तिघींचा जागीच मृत्यू

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये चार मुलींवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. नातेवाईक तरुणाने हे भयंकर कृत्य केले. यामध्ये ३ मुलींचा मृत्यू झाला.

Priya More
  1. झोपमोड झाल्याने तरुणाने चार मुलींवर हल्ला केला

  2. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील घटना

  3. ३ मुलींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर

  4. चार मुलींना घरात बोलावून कोयत्याने हल्ला केल्याची माहिती

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मन सुन्न करून टाकणारी घटना घडली. सुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रघुनाथपुर गावात रक्तरंजित थरार घडला. २१ वर्षीय तरुणाने आपल्याच कुटुंबातील ४ चिमुकल्यांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चारही मुली आरोपी तरुणाच्या नातेवाईक होत्या. घटनेच्या वेळी त्या त्यांच्या घराशेजारी खेळत होत्या. त्याचवेळी २१ वर्षीय आरोपी गुलाम सरवरची झोपमोड झाली. त्यामुळे तो संतप्त झाला त्याने चारही मुलींना एका खोलीत बोलावले आणि अचानक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौथ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोनिफा खातून (४ वर्षे), इशरत परवीन (१२ वर्षे) आणि अनिशा खातून (१० वर्षे) अशी मृत मुलींची नावं आहेत. चौथी मुलगी नुसरत जहाँची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमांमुळे ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपीला ड्रग्जचे व्यसन आहे. झोपेतून उठवल्यानंतर रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले.' या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे.

गावकऱ्यांनी सांगितले की, 'गुलामने आपल्याच कुटुंबातील चार मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला का केला हे आम्हाला अजिबात समजत नाही. आम्हाला संशय आहे की त्याला अचानक मानसिक आजाराचा झटका आला असावा किंवा तो मानसिक समस्येने त्रस्त असावा. तो असं काही करू शकत नाही.' या हत्याकांडाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी गुलाम सरवर उर्फ ​​बादशाहला ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणाच्या कसून तपास करत आहे. हत्येमागचे नेमकं कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT