Washim Crime Saam Tv
क्राईम

Washim Crime: अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, मृतदेह शेतात फेकला

Wife Killed Husband: वाशिममध्ये महिलेने आपल्या नवऱ्याची बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली. शेतामध्ये नेऊ त्याचा गळा आवळला त्यानंतर मृतदेह झाडाजवळ फेकून दिला.

Priya More
  • वाशिममध्ये पत्नीने पतीची हत्या केली

  • बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं

  • मृतदेह शेतात फेकून दिला

  • वाशिम पोलिसांनी दोघांना केली अटक

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये महिलेने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथे ही घटना घडली. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केली. या घटनेममुळे वाशिमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानी येथील सुरेश झलके हे पत्नीसह वाकळवाडी इथे सासरी राहत होते. गुरूवारी सुरेशचा मृतदेह शेतात आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तपासात अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याचे समोर आले.

सुरेशचा पत्नीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यातूनच पत्नी आशा झलके आणि तिचा प्रियकर महादेव अंभोरे यांनी सुरेशच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार आशा झलके यांनी सुरेशला बहाण्याने शेतात बोलावले. तेथे आधीपासूनच महादेव अंभोरे उपस्थित होता. दोघांनी मिळून सुरेशचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली टाकून दिला.

घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकी आणि मालेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी आशा झलके आणि महादेव अंभोरे यांना अटक केली. दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालेगाव पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT