Washim Crime Saam TV
क्राईम

Washim Crime: वाशिममध्ये चोरांचा सुळसुळाट; एका रात्रीत कुलूप तोडून ८ घरांमध्ये चोरी

Washim Crime News : चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील सर्व मुद्देमाल लंपास केलाय. यावेळी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. चोरट्यांनी कपाटातील सर्व सामान खाली फेकले आहे.

Ruchika Jadhav

मनोज जयस्वाल

Crime News :

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. गावात एकाच रात्रीत आठ ठिकाणी कुलूपबंद घरे फोडून चोरी करण्यात आली आहे. चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी परिसरातील सर्व कुलूपबंद घरांना टार्गेट केलं आहे. यामध्ये चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील सर्व मुद्देमाल लंपास केलाय. यावेळी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आलेय. चोरट्यांनी कपाटातील सर्व सामान खाली फेकले आहे. तसेच घरातील टीव्ही, फ्रिज यांचे देखील नुकसान केले आहे.

चोरट्यांनी आधी गावातील सर्व बंद घरांची पाहाणी केली. त्यांनंतर एकाच रात्रीत गावकरी गाढ झोपेत असताना घरे फोडली. या घरांमधील सर्व नागरिक कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सकाळी परिसरातील अन्य नागरिकांनी घराचे कुलूप तोडलेले असल्याचे पाहिले तेव्हा घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे समजले.

स्थानिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहाणी केली. या घटनेत एकूण किती मुद्देमालाची चोरी झालीये याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.

पोलिसांनी चोरी झालेल्या काही घरांच्या परिसरात श्वान पथकाद्वारे पाहणी केलीये. तसेच ठसे तज्ज्ञांकडूनही तपासणी करण्यात आली आहे. आठ घटनांपैकी गुप्ता बांधवांच्या घरी झालेल्या चोरीत मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास करण्यात चोरट्यांना यश आले. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडलं

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम आज सकाळी चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडलेय.

विशेष म्हणजे एका आलिशान कारमधून आलेल्या या चोरट्यांनी अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने तात्काळ गावातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वीस मिनिटातच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

Kitchen Hacks : भात शिजल्यावर चिकट होतो? आताच टाळा 'ही' चूक

SCROLL FOR NEXT