Wardha yarn company Gang Rape of minor girl Saam Tv News
क्राईम

Wardha Crime : डोळ्यात झोंबणारं औषध टाकलं, कंपनीतल्याच खोलीत नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; महाराष्ट्र हादरला

Wardha Minor Girl Gang Rape : १४ वर्षीय पीडिता धागा कंपनीच्या पॅकिंग खोलीत काम करत असताना आरोपींनी तिच्या डोळ्यात काही तरी टाकून तिला लगतच्या खोलीत नेलं. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

Prashant Patil

वर्धा : अल्लीपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका धागा कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उजेडात आली. या प्रकरणात तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जी.एम. गुरुमूर्ती, मोबीन खान अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावं असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. १४ वर्षीय पीडिता धागा कंपनीच्या पॅकिंग खोलीत काम करत असताना आरोपींनी तिच्या डोळ्यात काही तरी टाकून तिला लगतच्या खोलीत नेलं. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही आरोपी कंपनीतच काम करून तेथेच राहत होते. याबाबत पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, चंद्रपूर-गडचिरोली सीमेलगतच्या वैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेले एमबीबीएसचे विद्यार्थी बुडाल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन तरुण गडचिरोलीचे रहिवासी होते. सुट्टी असल्याने ते वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीलगत फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी वैनगंगा नदीत उड्या मारल्या. आठ पैकी तीन जण नदीत बुडाले, तर पाच पाण्यातून बाहेर निघण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी पोहोचून बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT