Wardha Crime News Saam tv
क्राईम

Wardha News: हिंगणघाट हादरले! आई रुग्णालयात,जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

wardha hinganghat Crime: मद्यपी बापाने चार दिवस सलग स्वत:च्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मोठं धाडस करत मुलीने शेजारच्या काकूला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News:

मद्यपी बापाने चार दिवस सलग स्वत:च्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मोठं धाडस करत मुलीने शेजारच्या काकूला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी बापाला पकडून पोलीस ठाण्याला नेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. सध्या आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडितेचे आई आजारी असल्याने तिला १ जानेवारीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे तिच्याजवळ तिचा १२ वर्षीय मुलगा राहत होता. तर पीडिता मुलगी ही घरी वडिलांसोबत राहत होती.

शेजारच्या महिलेने ठेवली पाळत

बाप दररोज मद्य पिऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार करायचा. दिवस-रात्र पीडिता आरोपीच्या वासनेची शिकार ठरली. अखेर पीडितने हा सर्व प्रकार शेजारच्या काकूंना सांगितला. मात्र, पीडितेच्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.

अखेर शेजारच्या काकूने पाळत ठेवली आणि वडील पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यानंतर पीडितेवर अत्याचार करू लागला. तेवढ्यातच शेजारच्या काकूने गावातीलच नागरिकांना सोबत घेऊन आरोपी बापाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं.

पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या निर्देशात ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT