Police investigation underway after a woman was allegedly murdered by her husband and sister-in-law in Virar, Maharashtra. Saam Tv
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून सूनेचा घर सोडण्याचा निर्णय; पती आणि नणंदेनं क्रूरतेनं संपवलं

विरार पश्चिमेतील एम बी इस्टेट परिसरात कौटुंबिक वादातून विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. पती आणि नणंद यांना बोळींज पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

मनोज तांबे, साम टीव्ही

विरारच्या एमबी इस्टेटमधील श्री संगम इमारतीत राहणाऱ्या महेश सोनी याने आपल्या लहान बहिणीच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. कल्पना सोनी (३५) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी पती महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) या दोघांना बोळींज पोलिसांनी अटक केली असून 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली.

मयत कल्पना सोनी (३५) ही विवाहित महिला विरार पश्चिमेच्या एम बी ईस्टेट मधील संगम सोसायटीमध्ये पतीसोबत राहत होती. २०१५ मध्ये तिथे लग्न महेश सोनी याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर सासरची मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असायची. शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. यावेळी मयत कल्पनाने घर सोडून जात असल्याचे सांगत आपले स्त्रीधन परत मागितले. यावेळी झालेल्या भांडणात पती महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) या दोघांनी मिळून कल्पनाला मारहाण केली. तिच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला

या प्रकरणी मयत कल्पनाचे मामा मनोहर सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोळींज पोलिसांनी पती महेश आणि नणंद कल्पना यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अखेर काँग्रेस-वंचितच्या आघाडीची घोषणा, काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ

योगी-मोदींशी वैर नाही, पण...; जैन मुनी नीलेश चंद्रांचा भाजपवर हल्लाबोल|VIDEO

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

SCROLL FOR NEXT