Vikhroli Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai News : चोरीसाठी इमारतीचे १४ मजले चढला, हात निसटल्याने धाडकन खाली पडला; विक्रोळीत सराईत चोरट्याचा मृत्यू

Vikhroli Crime News: विक्रोळीतील कन्नमवर नगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या २२ वर्षीय व्यक्तीचा १४ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.

Siddhi Hande

विक्रोळीमध्ये एक धक्कादायक घटना घटना आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका २२ वर्षीय व्यक्तीचा चौदाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने बिल्डिंगमध्ये घुसला असल्याचा संशय पोलिसांना आहे. रविवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली आहे.

अक्षय अर्जुन बाइत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय हा एक गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक चोरीच्या आणि हत्येचे गुन्हे दाखल आहेत. अक्षयवर एका व्यक्तीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे. पार्क साइट पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. एका व्यक्तीने त्याचे पैसे परत न केल्यामुळे त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. कसारा पोलिस ठाण्यातदेखील अक्षयविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकुंज सोसायटी, कन्नमवर नगर येथे ही घटना घडली आहे. या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डने सकाळी ६ वाजता तळमजल्यावर एक व्यक्ती पडल्याचे पाहिले. हा व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. अक्षयला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. या तपासात अक्षय १.३० वाजता बिल्डिंगमध्ये घुसला होता. त्याचा चेहरा रुमालाने बांधला होता. तो १४ व्या मजल्यापर्यंत चढत गेला. मात्र, त्याला तोल सावरता आला नाही आणि तो खाली पडला. अक्षय हा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra IAS Transfer : ऐन निवडणुकीच्या हंगामात 7 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Lizard Facts: पाल सलग पळताना का दिसत नाही? थांबत थांबत का पळते?

Love Rashifal: पाच राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव; बायकोशी वाद की रोमांस, जाणून घ्या विवाहितांसाठी कसा असेल दिवस?

Maharashtra Infrastructure: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

Mumbai Gold मेट्रो लाईन: मुंबईहून ४० मिनिटात गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

SCROLL FOR NEXT