Uttarakhand Rudrapur Rape Case Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : दिराची वहिनीवर वाकडी नजर; मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार

Uttarakhand Rudrapur Rape Case Crime news : उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये दिराने पैशांसाठी भावाच्या बायकोचा सौदा करून स्वतःच्या मित्रांच्या हवाली केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Alisha Khedekar

  • पैशांसाठी महिलेला सापळ्यात अडकवत अत्याचार झाल्याचा आरोप

  • आरोपी दीर असल्याने नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह

  • विष प्राशन अवस्थेत आरोपी रेल्वेत आढळला

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; सखोल तपास सुरू

उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या संतापजनक कृत्याच्यामागे दुसरा तिसरा कोणी नसून तिचा दीर असल्याचं समोर आलं आहे. पैशांसाठी त्याने स्वतःच्या भावाच्या बायकोचा सौदा केला. दरम्यान पोलीस पकडतील या भीतीने त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी उशिरा जीआरपी नजीबाबाद-नगीना रेल्वे स्थानकादरम्यान लिंक एक्सप्रेस ट्रेनमध्ये नियमित तपासणी करत असताना, पोलिसांना आरोपी अभय सक्सेना हा ट्रेनमध्ये विष प्यायलेल्या अवस्थेत बेशुद्ध स्थितीत आढळला. संशय आल्याने जीआरपीने त्याला तात्काळ नागीना रेल्वे स्थानकावर उतरवले आणि रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

अधिक चौकशी केल्यांनतर तपासात असे आढळले की आरोपी याने पैशांसाठी मित्रांची मदत घेऊन स्वतःच्या सख्ख्या भावाच्या बायकोचा सौदा केला. अभयला पैशांची गरज होती. त्याने त्याच्या भावाच्या बायकोला मित्रांच्या हाती सोपवलं. २२ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने पतीजवळ जत्रेला जायचा तगादा लावला होता. मात्र पतीने आणि इतर कुटुंबीयांनी तीला नकार दिला. याचाच फायदा अभयने उचलला. अभयने पीडित महिलेसोबत जाण्याची तयारी दाखवली.

जत्रेत आरोपीचे मित्र आधीच डब्बा धरून बसले होते. पीडित महिलेचा सतत पाठलाग करत होते. एका ठिकाणी महिला थांबल्यावर तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या मित्राने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याबदल्यात अभयला पैसे मिळाले. त्यानंतर अभयने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र पोलिसांच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु अखेर एका रेल्वे स्थानकादरम्यान तपासणी सुरु असताना अभय पोलिसांच्या तावडीत सापडला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅन्सरग्रस्त आमदाराच्या घरी आयकर विभागाची धाड; 50 अधिकारी अन् पोलीस, राजकीय वर्तुळात खळबळ

E-Sakal No.1: डिजिटल विश्वात ई-सकाळचाच दबदबा; नव्या वर्षांत सलग दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईत पुन्हा उपोषणाला बसणार? सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT