उत्तर प्रदेशातील (Uttar Prasesh) मथुरा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेवावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला होता. नक्की काय घटना घडली, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)
उत्तर प्रदेशच्या नौझील येथे एका वराला अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या घालून जखमी केल्याची घटना घडली. गोळीबार (Shot Groom) केल्यानंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले आहेत. नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन आपल्या कुटुंबासह वधूच्या घरी आला होता. जखमी वराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेबाबत मुलाच्या किंवा मुलीच्या कोणत्याही सदस्याने काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लग्नात नवरेदवावर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार अलीगढ येथील दमुआका येथील नवरा मुलगा गौरव बुधवारी रात्री लग्नासाठी वधूच्या घरी फरीदमपूरला आला होता. गौरवचा विवाह फरीदमपूर येथील निरंजन सिंग यांची मुलगी सोनमसोबत होणार (Shot Groom At Bride House) होता. मुलीच्या घरी लग्नाचे विधी सुरू होते. दरम्यान एका कारमध्ये चार ते पाच तरुण आले. त्यापैकी एकाने वराला गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने गौरव रक्तबंबाळ झाला. जखमी अवस्थेत त्याला सीएचसी नौझील येथे आणण्यात आले.
नवरदेवाच्या मांडीला गोळी लागल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वराच्या बाजूच्या लोकांमध्ये खळबळ उडाली (Uttar Prasesh news) आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. ही घटना शहरातील एका विवाहितेतील असल्याची माहिती आहे. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेबाबत मुलाच्या किंवा मुलीच्या कोणत्याही सदस्याने काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार नाही
याबाबत मथुराचे एसपी देहत यांनी सांगितलं की, १४ फेब्रुवारीच्या रात्री बुलंदशहरहून नौजील पोलीस स्टेशन परिसरात लग्नाची मिरवणूक आली होती. नवरदेव घोडीवर बसण्यासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार (crime news) केला. डॉक्टरांनी मांडीवरची गोळी काढली आहे. वराची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताच, त्याला घरी पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.
याप्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही, असं एसपी म्हणाले. तक्रार आल्यानंतर पोलीस तक्रार दाखल करून कारवाई करतील. त्याचबरोबर आजूबाजूचे लोकही या घटनेने आश्चर्यचकित झाले आहेत. विनाकारण अशी घटना कोणी का (wedding) करेल, अशी चर्चा परिसरात सुरू होते. आरोपींसोबत दोन्ही कुटुंबांचे जुने वैमनस्य होतं का? पोलीसही प्रकरणाचा आपल्या स्तरावर तपास करत आहेत, अशी माहिती टीव्ही९ च्या वृत्तानुसार मिळतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.