Uttar Pradesh Vrundavan Dog Abuse Case Saam Tv
क्राईम

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

Uttar Pradesh Vrundavan Dog Abuse Case : वृंदावनमध्ये कुत्रीवर झालेल्या बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • वृंदावनमध्ये प्राण्यावरील अत्याचाराची धक्कादायक घटना उघड

  • गंभीर अत्याचारामुळे कुत्रीचा मृत्यू

  • संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांकडे सोपवले

  • कठोर कारवाईची मागणी, पोलीस तपास सुरू

Uttar Pradesh Vrundavan Dog Rape Case Viral Video उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय व्यक्तीने एका कुत्रीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यामुळे त्या निष्पाप कुत्रीचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील गोविंद कुंडजवळील कुशवाह गल्लीत घडली आहे. एका ३५ वर्षीय मजुराच्या बायकोचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं. तिच्या जाण्याने तरुण खचला. तो नैराश्येत गेला. या नैराश्येतून या तरुणाने गल्लीतील एका पाळलेल्या कुत्रीवर बलात्कार केला. या अमानुष अत्याचारानंतर कुत्री गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले. जमावाने त्याच्या तोंडावर काळ फासलं आणि त्याच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून त्याची गावभर धिंड काढली. इतकंच नाही तर या नराधमाला स्थानिक नागरिकांनी चोप देत चांगलीच अद्दल घडवली.

स्थानिकांनी सांगितले की, वृंदावन सारख्या पवित्र शहरात अशा घटना घडणं लज्जास्पद आहे. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT