Lakhimpur Crime News  Crime News
क्राईम

Crime News : प्रेम की विकृती! तरुणीने लग्नाला नकार दिला; त्याने लोखंडी रॉडने तिच्या चेहऱ्यावर स्वतःचं नाव कोरलं

Lakhimpur Crime News : तरुणीने लग्न करण्यासाठी नकार दिल्याने तरुणाने तिच्या चेहऱ्यावर आपलं नाव कोरलं आहे. सदर घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खिरी येथे एक विकृत घटना घडली आहे. तरुणीने लग्न करण्यासाठी नकार दिल्याने तरुणाने तिच्या चेहऱ्यावर आपलं नाव कोरलं आहे. सदर घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

लोखंडी रॉडने लिहिलं नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आपल्या तक्रारीत माझ्यावर लैंगिक अत्याचार देखील झालेत असं म्हटलं आहे. 19 तारखेला ती दुकानात काही सामान घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे तरुण आला. त्याने तिला आपल्याबरोबर चल असे म्हटले. तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याला राग अनावर झाला. त्याने थेट तरुणीला उचलून घरी आणले. तिचे तोंड कापडाने बांधले. त्यानंतर एक लोखंडी रॉड घरम केला.

त्याने आपल्या आई आणि बहिणीच्या मदतीने तरुणीच्या चेहऱ्यावर स्वतःचं 'अमन' असं नाव लिहिलं. पीडित तरुणीने म्हटलं की, ही घटना घडत होती तेव्हा त्याची आई आणि बहिण दोघीही येथे उपस्थित होत्या. त्या दोघींनी माझे हात आणि पाय धरुन ठेवले होते. मी फार ओरडले स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने माझ्या चेहऱ्यावर स्वतःचं नाव लिहिलं. या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

लग्नासाठी विचारलं होतं

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणी ज्या ठिकाणी राहते त्याच परिसरात तरुण राहत होता. तो तरुणीला पसंत करत होता. तिने आपल्याशी लग्न करावं असं त्याला वाटत होतं. त्यासाठी त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणी त्याला पसंत करत नव्हती त्यामुळे तिने त्याला नकार दिला होता. हा नकार त्याला सहन न झाल्याने आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा तरुणीला द्यायची असं त्याने ठरवलं. त्यानंतर या विकृत तरुणाने तिच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉड गरम करून स्वतःचं नाव लिहिलं. सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT