Crime News Google
क्राईम

Shocking News: आधी बेदम मारहाण, नंतर तीनवेळा जीप अंगावर घातली; ८ जणांनी मिळून केली तरूणाची हत्या

Youth Killed In Ghaziabad: उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरूणाची आठ जणांनी मिळून हत्या केली आहे.

Rohini Gudaghe

Uttar Pradesh Crime News

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे दारूच्या नशेत 8 तरुणांनी आधी एका ऑटोस्वार तरूणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून दिलं. आपल्या जीपने तीन वेळा चिरडून (Crushing With Car) त्याची हत्या केली आहे. (Latest Crime News)

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला (Youth Killed) आहे. दुसरीकडे या घटनेच्या विरोधात मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निदर्शने केली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांमध्ये तीव्र संताप

यावेळी आरोपींना अटक करावी, योग्य नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. ही घटना गाझियाबाद जिल्ह्यातील सारा गावाबाहेर (Youth Killed In Ghaziabad) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा आठ तरुण गावाबाहेरील कूपनलिकेवर बसून दारू पीत होते. या लोकांनी आपली जीप रस्त्यात उभी केली होती. दरम्यान, त्याच गावात राहणारा प्रदीप हा त्याची ऑटो घेऊन आला होता. त्यानी आरोपींना त्यांची जीप बाजूला करायला सांगितली.

याचा आरोपींना राग आला. त्यांनी शिवीगाळ करत प्रदीपला ऑटोतून बाहेर ओढलं आणि जमिनीवर फेकलं. यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतरही त्यांचं समाधान न झालं नाही, म्हणून त्याला जीपसमोर ( Crime News) फेकलं. त्याला तीनदा गाडीखाली चिरडले. त्यामुळे प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांनी आंदोलन केलं

मृत तरूणाच्या कुटुंबीयांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसंच योग्य नुकसान भरपाईसह कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली (Uttar Pradesh Crime News) आहे. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास गावातील लोक दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे रोखतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या गाझियाबाद (Ghaziabad) पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना समज देऊन शांत केलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. पोलीस त्यांच्या शोधात व्यस्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT