Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: चारित्र्यावर संशय, शिक्षक नवऱ्याकडून बायकोची हत्या, डोक्यावर कुकरने हल्ला नंतर डोकं पाण्यात बुडवून संपवलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये शिक्षकाने बायकोची निर्घृण हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून त्याने हे भयंकर कृत्य केले.

Priya More
  • उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक नवऱ्याकडून बायकोची हत्या

  • बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने केली हत्या

  • कुकरच्या झाकणाने डोक्यावर वार करत संपवलं

  • आधी डोक्यावर वार केले नंतर पाण्याने भरलेल्या टबमध्ये डोकं बुडवून हत्या केली

उत्तर प्रदेशमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. आरोपीने बायकोच्या डोक्यावर कुकरने वार केले त्यानंतर तिचे डोकं पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवून तिची हत्या केली. बायकोच्या हत्येनंतर त्याने तिला रुग्णालयात नेले. त्याठिकाणी त्याने रडण्याचे नाटक केलं पण त्याचे नाटक फारकाळ टिकले नाही. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने हे भयंकर कृत्य केल्याची माहिती तपासातून उघड झाली.

आरोपी बायकोवर संशय घेत होता. आपल्या बायकोचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्याला वाटत होते. पण हत्या झालेल्या महिलेच्या वडिलांनी जावयाने केलेला अनैतिक संबंधाचा दावा फेटाळून लावला. आरोपी हा शिक्षक आहे. आरोपीने ८ ऑगस्ट रोजी भावाच्या मदतीने बायकोची हत्या केली. आरोपीने बायकोसोबत वाद घातला. त्यानंतर त्याने कुकुरच्या झाकणाने तिच्या डोक्यावर अनेक वेळा वार केला. या घटनेत त्याची बायको गंभीर जखमी झाली आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर पाण्याने भरलेल्या टबमध्ये तिचे डोकं बुडवून ठेवले.

हत्या करण्यात आलेली महिला देखील शिक्षिका होती. या प्रकरणी हत्या झालेल्या महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी दिलीप यादवने ८ ऑगस्टला सकाळी बायकोची हत्या केली. त्याने तिच्या डोक्यावर कुकरने हल्ला केला नंतर पाण्याच्या टबमध्ये तिचे डोकं बुडवून तो २० मिनिटं बाहेर फिरत राहिला. त्यानंतर त्याने भावाला फोन करून त्याला बोलावून घेतलं. त्याने भावाला बायको बेशुद्ध पडल्याचे सांगत नाटक केलं आणि तिला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. दिलीप आणि शिलीनी यांचा प्रेमविवाह होता. लग्नानंतर ते भाड्याच्या घरात राहत होते. पण त्यांचे नेहमी भांडण होत होते. दिलीप शालिनीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यामुळेच तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT