Crime News Saam Tv
क्राईम

Uttar Pradesh Crime News: मोबाईलसाठी बायकोने नवऱ्याचा डोळाच फोडला; उत्तर प्रदेशातील घटनेने खळबळ

Crime News: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरुन बायकोने कात्रीने हल्ला करत नवऱ्याचा डोळ्याला इजा पोहोचवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Bagpat Crime News:

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरुन बायकोने कात्रीने हल्ला करत नवऱ्याचा डोळ्याला इजा पोहोचवली आहे. नवरा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याने बायकोकडे गाणी ऐकण्यासाठी मोबाईल मागितला होता. यावरुन झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियंका असे पत्नीचे नाव आहे. तर अंकित असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे.

अंकितने प्रियंकाकडे गाणी ऐकण्यासाठी तिचा मोबाईल (Smartphone) मागितला होता. परंतु, तिने फोन देण्यास नकार दिला. तरीही अंकितने मोबाईलसाठी देण्यास आग्रह केला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान प्रियंकाला राग अनावर झाला. संतापलेल्या प्रियंकाने अंकितच्या डोळ्यावर कात्रीने वार केला. यात अंकित गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पत्नी प्रियंकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. अंकितच्या कुटुंबियांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT