UP Crime News Saam Digital
क्राईम

UP Crime News: धक्कादायक! मजुराचा खून करून मृतदेह शेतात पुरला; त्यावर बटाट्याची केली लागवड, पोलीसही चक्रावले

UP Crime News: एका अल्पवयीन मजुराची हत्या करून मृतदेह शेतात पुरला आणि त्यावर बटाट्याची लागवड करण्यात आल्यामुळे पोलीसही चकीत झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP Crime News

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधून खूनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मजुराची हत्या करून मृतदेह शेतात पुरला आणि त्यावर बटाट्याची लागवड करण्यात आल्यामुळे पोलीसही चकीत झाले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून शेतात पुरलेला मृ्तदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

नारथी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सलेमपूर गावात ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित ठाकुर या शेतकऱ्याचे त्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या कृष्णासोबत कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर सुमितने कृष्णाचा खून केला आणि कोणाला सुगावा लागू नये म्हणून मृतदेह शेतात पुरला. आश्चर्य म्हणजे त्यावर बटाट्याची लागवडही केली.

१९ ऑक्टोबर रोजी सुमितने बटाट्याच्या लागवडीसाठी ट्रक्टर भाड्याने घेतला होता. यासाठी कृष्णाला शेतात कामासाठी बोलावले होते. काम संपल्यानंतर सुमित घरी आला मात्र, कृष्णा घरी परतला नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात तो हरवल्याची तक्रार दाखल केली.

कृष्णाच्या वडिलांनी सांगितले की, सुमित आणि त्याचा भाऊ कृष्णाला बटाटे लागवड करण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या मुलगा घरी परतलाच नाही. त्यांनी आरोपींच्या घरी जाऊन विचारपूस केली, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा संशय अधिक बळावला. सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुमितला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने कृष्णाचा खून केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस त्याला मृतदेह पुरलेल्या ठिकाणी घेऊन गेले. मृतदेह पुरलेल्या ठिकाणी चक्क बटाट्याची लागवड केलेले पाहुण पोलीसही चक्रावले. त्यानंतर मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सुमित ठाकुरने कृष्णाच्या शरिरावर धारधार शस्राने वार करून त्याचा खून केला आणि मृतदेहाचे तुकडे करून शेतात पुरला होता. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कृष्णा अल्पवयीन असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर देशभक्तीचा जल्लोष; ‘ऑपरेशन सिंदूर’ला आकाशातून सलामी|VIDEO

Independence Day 2025 Live Update: कल्पना घेऊन या मी तुमच्यासोबत आहे, तरुणांना पीएम मोदींचे पुढे येणाचं आव्हान

Thane Fire News : ठाण्यात अग्नितांडव! इमारतीला भीषण आग, २२ व्या मजल्यावर अडकलेल्या महिलेचा मृत्यू

Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी तांदळाचे 'हे' उपाय नक्की करा; एक उपाय तुम्हाला करेल मालामाल

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या दिवशी २१वा हप्ता येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT