Uttar Pradesh Crime 80 year old Woman Physical Abused SaamTV
क्राईम

Uttar Pradesh Crime: संतापजनक! ८० वर्षांच्या महिलेवर गावातल्याच २४ वर्षीय तरूणानं केला बलात्कार

Uttar Pradesh Crime Woman Physical Abused: एका २४ वर्षीय तरूणाने एका ८० वर्षाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कोतवाली गावात घडलीय. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आलीय.

Bharat Jadhav

मानवतेला लाजेवल अशी घटना उत्तर प्रदेशाच्या अमेठी जिल्ह्यातील कोतवाली भागातील घडलीय. एका २४ वर्षीय मद्यधुंद तरुणाने एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केलाय. या घटनेमुळे अमेठी शहरात मोठी खळबळ उडालीय. आजारी वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जातोय. मोहम्मद इश्तियाक अली असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे.

या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ही घटना ७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता घडली. जेव्हा वृद्ध महिलेचे संपूर्ण कुटुंब शेजारच्या एका कार्यक्रमाला गेले होते आणि वृद्ध महिला घरी एकटी होती. त्यावेळी यानंतर इश्तियाक अली या तरुणाने रात्री साडेबारा ते अडीचच्या दरम्यान घरात घुसून वृद्ध महिलेला एकटी दिसल्यानंतर आधी तिचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधम तेथून फरार झाला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वृद्ध महिला गेल्या तीन-चार वर्षांपासून आजारी होती आणि अंथरुणाला खिळून होती. समारंभ आटोपून कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांनी घरातील दृश्य पाहून हादरले. घरातील दृश्य पाहून काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या कातपाडीजवळ एका गर्भवती महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. तिला ट्रेनमधून ढकलून दिल्याची घटनाही समोर आली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

एक्सप्रेस ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार

बलात्काराच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्येच ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शनिवारी मध्यरात्री दीड वाजता नराधमाने महिलेवर एक्स्प्रेसमध्ये बलात्कार केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,५४ वर्षीय महिला आपल्या १९ वर्षीय मुलासोबत हरिद्वारमधून फिरण्यासाठी मुंबईला आली होती.

एका नातेवाईकाकडे जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्म सहा आणि सातच्या मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी एका नराधमाने महिलेवर अत्याचार केला. रात्री एक वाजता २७ वर्षीय व्यक्ती आला. त्याने गुपचूप मला उठवले तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेलं. चौकशी करू लागला अन् जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले अन् अत्याचार केला. पीडित महिलेच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT