उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात एका नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झालं. हे भांडण इतकं जोरदार झालं की, पती पत्नीच्या गळ्यावर चाकून वार केले. या चाकू हल्ल्यात पत्नी रक्तबंबाळ झाली. त्यानंतर गर्दीवर पाहून घाबरलेल्या नवऱ्यानं स्वता: ला चाकू भोसकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Latest News)
उत्तर प्रदेशातील वाराणसीतील शिवपूर बाजारातील एका दुकानात एका जोडप्यामध्ये जोरादार भांडण झालं. या भांडणातून पतीने भरगर्दीत पत्नीच्या गळ्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी रक्तबंबाळ झाली. त्यानंतर घाबरलेल्या पतीने गर्दीला पाहून स्वत:च्या गळ्यावर चाकू हल्ला करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानाजवळ जमलेलेल्या गर्दीने चाकू हल्ला करणाऱ्याला पतीला चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे घटना
वाराणसीतील घटना गुरूवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं नाव नेहा आहे. तर चाकू हल्ला करणाऱ्या पतीचं नाव कुंदन सांगितलं जात आहे. दोन दिवसापूर्वीचं या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी नेहा चंदौलीहून वाराणसीला गेली होती. तेथे ती एका कपड्याच्या दुकानात काम करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या दोघांमध्ये परत एकदा जोरदार वाद झाला. त्यावेळी कुंदनने नेहाचा हात पकडला, याचा राग येत नेहाने कुंदनला चापट मारली. त्यानंतर कुंदनने तिच्या डोक्याचे केस पकडत तिला खाली पाडलं. त्यानंतर आपल्याकडील चाकू काढत नेहाच्या गळ्यावर चाकू हल्ला केला. यात नेहा रक्तबंबाळ झाली.
दरम्यान स्थानिकांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी कुंदनला पकडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून कुंदन घाबरला आणि त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने पकडलं आणि त्याला चोप दिला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कुंदन तिला भेटण्यासाठी आला होता. नेहाचा राग शांत करण्याचा प्रयत्न तो करू लागला होता. कुंदनला नेहाचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणामुळे कुंदन तिला समजवण्यासाठी वाराणसी येथे आला होता. कुंदनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नेहाच्या प्रियकरानेच त्याला नेहाची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.