Crime News  Saam tv
क्राईम

Crime News : प्रेमाला विरोध केल्याने तरुणी संतापली, प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईलाच संपवलं, भयानक घटना

Up Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे मुलीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रेदशातील एका लहानश्या गावातून माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक भयानक घटना समोर आलेली आहे. मुलीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची गळा आवळून हत्या केली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्या हादरून गेला असून संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील (Up)बांदा जिल्ह्यात एका तलावात पोलिसांना राजुलिया (वय ४५)एका महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे समजते. संपूर्ण घटना ता.३० जुलै २०२४ रोजी उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या तपासात, तलावात मिळालेल्या मृतदेहाची हत्या महिलेच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने केल्याचे समजते. सध्या या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोघांना मदत करणाऱ्या अजून एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनाक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना ता.३० जुलै २०२४ची आहे. बांदा जिल्ह्यातील अटारा पोलीस चौकीच्या हद्दीतील एका गावातील असलेल्या तलावात एका महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. मृतदेहाची ओळख नागरिकांना तात्काळ पटल्याने पोलिसांच्या मदतीने या महिलेच्या पतीने पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखक केल्यानंतर पोलिसांना तात्काळ या प्रकरणाचा तपास(investigation) सुरु केला. या तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या,ज्यात मृत महिलेच्या मुलीचे तिच्यात गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मृत महिलेने दोघांना एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते असल्याचे समजले.

यानंतर मुलीच्या आईमध्ये आणि मुलीमध्ये अनेक टोकाचे वादही झाले होते. आईने रागवल्याने मुलगी नाराज होती त्यानंतर रागाच्या भरात मुलीने आणि तिच्या प्रियकराने (boyfriend)तिच्या आईला मारण्याचा कट रचला.रात्रीच्या दरम्यान आई अर्थात ती महिला झोपलेली असताना मुलीने आणि तिच्या प्रियकर शिवाय त्यांच्या साथीदाराने महिलेची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह त्या गावाबाहेरील तलावात नेऊन फेकून दिला.

पोलिस स्टेशनचे एएसपी म्हटले की, संपूर्ण घटना ३० जुलै रोजी घडली. या घटनेत मृत महिलेच्या मानेचे हाड पूर्णपणे मोडले आहे. आरोपी मुलीचे आणि मुलाचे प्रेमसंबंध होते आणि आईने मुलीला काही महिन्यांपूर्वी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि त्याचा राग (anger)आईला आल्याने आईने मुलीला रागवले होते. आईच्या बोलण्याचा राग आल्याने मुलीने प्रियकराने घरी बोलावून आईच्या हत्येचा कट रचला. या गुन्हातील दोघांना अटक करण्यात आलेली असून दुसरा आरोपी फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT