Ulhasnagar Crime News Saam TV
क्राईम

Ulhasnagar Crime: गुटखा न दिल्याने वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना!

Maharashtra Latest News: १० ते १५ जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर, ता. २४ जून २०२३

क्षुल्लक कारणावरुन २१ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. १० ते १५ जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल कोरी हा उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री चहा प्यायला गेला होता. त्याठिकाणी आरोपी अवि याने अनिलकडे गुटखा मागितला. अनिलने दिला नाही त्यावरून दोघांमध्ये वादविवाद होऊन शिवीगाळ झाली. अनिल हा कॅम्प नंबर 3 च्या खेती एरिया परिसरात घरी परतत असताना अवि आणि त्याच्या साथीदारांनी अनिलला रस्त्यात गाठून जीवघेणा हल्ला केला.

10 ते 15 जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अनिल कोरीला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये अनिल कोरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आरोपी अवी, संतोष, अर्जुन विटेकर, भोलू गुप्ता, साहिल गागट, अमोल सावंत, आयुष राय ,पवन छम्मा यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT