Karnataka Crime News Saam Digital
क्राईम

Ulhasnagar Crime: कचरा टाकण्यावरुन वाद.. टोळक्याकडून दोघा भावांना बेदम मारहाण; १ जखमी

Ulhasnagar Crime News: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून चार ते पाच जणांनी दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला

अजय दुधाणे

उल्हासनगर, ता. १५ एप्रिल २०२४

कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून चार ते पाच जणांनी दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून चार पाच जणांनी दोन भावांना मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील अशोक नगरमध्ये राहणारे मुलानी यांच्या घराजवळ शेजारी कचरा टाकत असल्याने मुलानी कुटुंबियांनी याबाबत शेजाऱ्यांना विचारणा केली.

यावेळी दोघांमध्ये वाद होऊन या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी चार पाच जणांनी जावेद रहीम मुलाणी आणि नवीद रहीम मुलाणी यांना बेदम मारहाण केली, त्यात नवीद रहीम मुलाणी गंभीर जखमी झाले. त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये (Pune) सामान देण्यासाठी आलेल्या दोघा डिलिव्हरी बॉयनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. डंझो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेशात येऊन दोन आरोपींकडून पितळेच्या मूर्तीची चोरी करण्यात आली. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीत ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात पावसाचे रौद्ररूप, लोणीमध्ये घरा-दारात पाणी, संसार बुडाला, लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी थांबली; CSMT कडे जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या

Pitru Paksha 2025: पितृपक्षात वरणभाता ऐवजी कोणते पदार्थ नैवेद्यात ठेवू शकतो?

Couple Gemini Photo: जोडीदारासोबत रेट्रो लूक करायचाय? पण जमत नाही, ट्राय करा 5 ट्रेडिंग Prompt

Vicky Jain: 'कपड्यांवर अन् वॉशरूममध्ये रक्त...; अंकिताच्या नवऱ्याने स्वत: सांगितला कसा झाला अपघात

SCROLL FOR NEXT