Ulhasnagar News Saam Tv
क्राईम

Ulhasnagar Shocking : कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत, शिक्षा म्हणून चिमुकल्याला अमानुष मारहाण

Ulhasnagar News : उल्हासनगरातील प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला टाळ्या न वाजवल्यामुळे शिक्षिकेने कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरात प्ले ग्रुपमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर शिक्षिकेची मारहाण

  • कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्यामुळे शिक्षिकेने कानाखाली मारली

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांची तक्रार, विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

  • पालकांमध्ये संताप आणि बालहक्क संघटनांकडून कठोर शिक्षेची मागणी

उल्हासनगरमधून अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. शहरात एका प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुप ची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅप परिसरातील एका प्ले ग्रुपमध्ये हा अडीच वर्षाचा चिमुकला शिकण्यासाठी गेला असता प्ले ग्रुपच्या शिक्षिका मुलांना कविता शिकवत होत्या. यावेळेस शिक्षिकेनेमुलांना कविता म्हणत टाळ्या वाजवायला सांगितल्या. मात्र या चिमुकल्याने काही प्रतिसाद न दिल्याने प्ले ग्रुप मधील शिक्षिका गायत्री पात्र हीने त्या चिमुकल्याच्या कानाखाली मारली.

सलग तीन वेळा या मुलाच्या कानाखाली मारण्यात आली त्यामुळे हा चिमुकला घाबरला ,हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये चित्रीत झाला आहे, हा व्हिडिओ मुलाच्या पालकांना पाहिला असता त्यांनी तत्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गायत्री पात्र या शिक्षके विरोधात तक्रार दाखल केली , त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या काळजी आणि संरक्षण कायद्या अंतर्गत शिक्षकेवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेनंतर पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या शिक्षिकेला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे की, आपल्या शाळा आणि प्ले ग्रुपमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी नेमक्या किती प्रमाणात दक्षता घेतली जाते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT