tyre brust at mumbai agra national highway 1 died 20 injured near dhule saam tv
क्राईम

Dhule Accident News : बाभळे फाटानजीक मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार; 25 जण जखमी

mumbai agra national highway : या वाहनातील सर्व प्रवासी हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे.

भूषण अहिरे

- भूषण अहिरे

Dhule :

मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे मालवाहू वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. या अपघातात वीस ते पंचवीस मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - मुंबईकडून मध्यप्रदेशकडे जात असताना मालवाहू वाहनाचा शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे अपघात झाला. या वाहनातील सर्व प्रवासी हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे पंचवीस मजूर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. यामधील सहा ते सात मजूरांची प्रकृती गंभीर बनली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रचाराच्या नियमांत मोठा बदल; आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला वेग? जयंत पाटील,अमोल कोल्हे सिल्वर ओकवर दाखल; शरद पवारांसोबत खलबतं सुरू

Bhai Dooj Horoscope: भाऊबीजेचा सण ठरणार 'या' राशींसाठी खास; कुटुंबाचा पाठिंबा, तर काहींना मिळणार यशाची संधी

Maharashtra News Live Update: अमोल कोल्हे आणि जयंत पाटील पवारांच्या भेटीला, आज पुन्हा सिल्वर ओकवर खलबतं

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

SCROLL FOR NEXT