two youth hits cab driver in nagpur  Saam Digital
क्राईम

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

यशच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्यात शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

नागपूर येथे जुन्या वादातून तरुण कॅबचालकाची दोघांनी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून खून केल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यश गोनेकर असं मृताचे नाव आहे. शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी अशी संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी यश आणि अरबाजचे भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवून रात्रीच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉलजवळ संशयित आरोपींनी त्याला अडवलं. यावेळो मनातील राग ठेवून त्यांनी यश याच्यावर वार केले. यात यश गंभीर जखमी झाला.

त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती यशच्या कुटुंबियांना मिळताच ते रुग्णालयात पोहचले. यावेळी यशने कुटुंबीयांनी सर्व हकीकत सांगितली. तसेच काेणी मारले त्यांची नावे सांगितली. त्याला पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यशच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्यात शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस दोन्ही संशयित आरोपींचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Cooking Tips: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

GST चा १२ टक्के स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टरसह विमा स्वस्त होण्याची शक्यता

जिलेबी-समोसा सिगारेट इतकंच धोकादायक; व्हायरल बातमीमागचं सत्य काय? सरकारकडून स्पष्टीकरण

Panchayat Actor : 'पंचायत' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, वाचा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT