two wheeler thief arrested along with 29 bikes in amravati saam tv
क्राईम

Amravati Crime News : दुचाकी चाेरीसाठी मास्टर चाव्यांचा वापर, 29 बाईकसह एकास अटक; सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दुचाकी चाेरीचा कसून तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समाेर आली.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

मास्टर चाव्यांचा वापर करुन चाेरलेल्या 29 दुचाकींसह काेतवाली पाेलिसांनी चाेरट्यास अटक केली आहे. या चाेरट्याची अधिक चाैकशी सुरु आहे. चाैकशीअंती चाेरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अमरावतीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सागर पाटील यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे नागरिक पाेलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज हाेते. पोलिसांनी दुचाकी चाेरीचा कसून तपास करीत एकास संशयावरून ताब्यात घेतले होते.

शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी संशयिताची अधिक चाैकशी केली असता त्याने तब्बल 29 दुचाकी चाेरी केल्याची माहिती समाेर आली. ही चाेरी ताे चार मास्टर चाव्यांचा वापर करून करायचा अशी माहिती पाेलिसांना समजली. या प्रकरणात पोलिसांनी संशयितास अटक केली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

Maharashtra News Live Update: शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT