two families dispute on issue of road near mulshi Saam Digital
क्राईम

Maval: शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन कुटुंबात वाद, प्रकरण पोहोचलं हिंजवडी पोलिस ठाण्यात

दिलीप कांबळे

मुळशी तालुक्यातील नेरे गावात शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता इतका विकाेपाला गेला आहे की थेट कुटुंबियांनी एकमेकांवर आराेप करीत हिंजवडी पोलिसांत दाद मागितली. दरम्यान नेरे ग्रामपंचायतीने रस्ता बंद करणाऱ्या एका कुटुंबाला नाेटीस बजावली आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागायचा ताे लागेल परंतु सध्या मुळशी तालुक्यात जमिनीला सोन्याचे भाव आल्यने असे शेत जमीनीचे वाद उफाळून येत असल्याचे चित्र आहे.

नेरे गावात वडिलोपार्जित मालमत्तेत वास्तव्यात असलेले जाधव कुटुंब यांच्या घराकडे जाणारा रस्ता शेंडगे कुटुंबाने खोदला. त्याची तक्रार ग्रामपंचायतीपर्यंत गेली. ग्रामपंचायतीने शेंडगे कुटुंबाला नोटीस बजावली. दरम्यान मुळात हा रस्ता गायरान मधून जात आहे मात्र माझ्या मालकीचा आहे. तो आमच्या वहिवाटीसाठी तयार केला होता असा दावा शेंडगे  कुटुंबीयांनी केला. हा रस्ता वडिलोपार्जित असून आम्हाला जायला दुसरा कुठलाही रस्ता नाही असा दावा करीत जाधव कुटुंबियांनी त्यांची कैफियत शासन दरबारी मांडली.

या रस्त्याचा विषय मुळशी तहसीलदार, बीडीओ, सर्कल आणि ग्रामपंचायत यांच्या दरबारी गेला. दरम्यान जमिनीचा हा वादा आता हिंजवडी पोलिस ठाण्यात गेला. रस्ता अडवला म्हणून जाधव कुटुंबाने शेडगे कुटुंबाबाबत तक्रार केली आहे. सध्या मुळशी तालुक्यात जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत, त्यामुळे शेत जमीनीचे वाद उफाळून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT