two died five injured in a road accident at wada bhiwandi highway  Saam Digital
क्राईम

Accident News : अपघात घडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नांत चालकाची पादचारी, दुचाकीस्वारस धडक; दाेन ठार, पाच गंभीर जखमी

Shahapur Latest Marathi News : या अपघातामधील जखमींना प्राथमिक उपचार करून त्यांना पुढीर उपचारासाठी ठाणे येथे रूग्णालयात पाठविण्यात आले आहे अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur News :

वाडा भिवंडी महामार्गावर भरधाव टेम्पो चालकाने तीन बाईक व रस्त्यावरील चालणाऱ्या नागरिकांना धडक देत पलायन केले. दरम्यान नेहरोली गावाजवळ संबंधित टेम्पो चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघात दाेन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. टेम्पो चालक हा मनोरहून वाडा मार्गे भिवंडीला निघाला हाेता. वाडा भिवंडी महामार्गावर गांद्रे गावा जवळ टेम्पो चालकाने पहिल्या दुचाकीला धडक दिली.

त्यानंतर त्याने टेम्पो वेगात पुढे नेत पळून जाण्याच्या प्रयत्नांच याच महामार्गावर शिरिषपाडा जवळ पायी जाणाऱ्यांना धडक दिली. तेथून त्याने टेम्पाे पुढे दामटत भिवंडीच्या दिशेने पळाला. त्याच्या पुढे त्याने पुन्हा नेहरोली गावा जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. तेथे पळून जाण्याचा प्रयत्न त्याचा फसला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT