Nagar Crime News saam tv
क्राईम

Diwali 2023 : दिवाळीच्या लगबगीत बुरखाधारी महिलांनी साधला डाव, डायमंड चाेरीने सराफ बाजारात खळबळ

Nagar Crime News : ताेफखाना पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : अहमदनगर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉन्स जवळ असलेल्या कल्याण ज्वेलर्स (kalyan jewellers nagar) या दुकानांमधील तीन लाख रुपये किंमतीचे हिऱ्याचे दागिने दोन बुरखाधारी महिलांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत काल रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

सहा तारखेला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण ज्वेलर्स या दुकानात दोन बुरखाधारी महिला या दागिने पाहण्यासाठी आलेल्या होत्या. यावेळी सेल्समन पूजा जगताप या त्यांना दागिने दाखवत होत्या.

त्यांची नजर चुकवून या दोन महिलांनी तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत पूजा जगताप यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दाेन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्वेलर्स, कपडे आणि इतर दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यातच अशा प्रकारचे चोरीचे प्रकार वाढत असतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान तब्बल तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

SCROLL FOR NEXT