titwala police charged three for hitting youth  Saam Digital
क्राईम

Kalyan Crime: जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, भांडण सोडवण्यास गेलेली तरुणाची आईही जखमी; घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी हर्षल इंगळे , अक्षय जाधव, अर्जुन जेडीया या तिघांविरोधात गुन्हा दाखल नाेंदविला आहे. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमूख

जुन्या वादातून काही तरुणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील वरप गावात घडली. धक्कादायक म्हणजे या भांडणात तरुणाला वाचवण्यास गेलेली तरुणाच्या आई देखील जखमी झाली आहे. हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनूसार कल्याण जवळील वरप गावात नेहाल परवेज हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. नेहालचे काही तरुणांसोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून बुधवारी रात्रीच्या सुमारास काही तरुण नेहाल याच्या घरात जबरदस्ती घसुले.

या तरुणांनी नेहालला मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहालवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला गेला. या हल्ल्यात नेहाल गंभीर जखमी झाला. धक्कादायक म्हणजे यावेळी नेहालची आई भांडण सोडवण्यास गेली असता तिच्यावर देखील या तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यात नेहाल व त्याची आई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT