Titwala Crime Saam Tv
क्राईम

Titwala Crime: मुली आवडतात म्हणून केलं भयानक कृत्य, कुणी नसल्याचे पाहून घरात घुसला अन्...

Titwala Police: टिटवाळ्यामध्ये दोन शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Priya More

कल्याणनजीकच्या टिटवाळा परिसरातील विनयभंगाची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. या घटनेमुळे टिटवाळ्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने हे लाजीरवाणं कृत्य केले. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुकातल्या टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. हेमंत पवार असं या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर टिटवळ्यामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

'मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने भरदिवसा घरात घुसून दोन्ही विद्यार्थिनीचा विनयभंग केला. घडल्या प्रकारामुळे या मुली घाबरल्या त्यांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे रिक्षा चालकाने तिथून पळ काढला.

या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. टिटवाळा परिसरात सतत वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT