Ulhasnagar crime News  
क्राईम

Crime News : उल्हासनगरमध्ये मध्यरात्री थरार, रस्त्यावर थांबवलं अन् त्याचा गळा चिरला

Ulhasnagar crime : उल्हासनगरमध्ये मध्यरात्री खुनी थरार रंगला होता. मध्यरात्री दोन वाजता उल्हासनगरच्या रस्त्यावर एका युवकाला थांबवलं अन् गळा चिरून जीव घेतला.

Namdeo Kumbhar

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Ulhasnagar crime News : उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर भागात एका युवकाची रात्री उशिरा निर्घृण हत्या करण्यात आलीय. हा युवक त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता. शांतीनगर भागात असलेल्या रेमंड शोरूम च्या समोरील रस्त्यावरून हा युवक रात्री दोन वाजेच्या सुमारास अॅक्टिवा वरून जात होता. त्यावेळी त्याची अॅक्टिवा थांबवून बाचाबाची झाली, त्यानंतर गळा चिरण्यात आला. या घटनेत सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव पंकज निकम असे आहे.

पंकज यांची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अजून समोर आलेले नाही. या हत्येमागील आरोपी कोण आहेत तेही अजून समजू शकले नाह. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पंकज हा जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी पाच दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील आपल्या पाहुण्याकडे आला होता. पण रात्री दोन वाजता उल्हासनगर -कल्याण रोडजवळ हत्या झाली. पंकज याचं दोन अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्याला एक मुलगा आहे.पंकज याच्या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केलाय, सीसीटीव्ही फुटेजच्या आधावर पोलीस आरोपाचा शोध घेत आहेत.

चोरीची दुचाकी घेऊन फिरले, अन पोलिसांना सापडले!

उल्हासनगरमध्ये काही संशयित इसम चोरीची बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी पिंट्या थोरवे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं अमरडाय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रवी जैस्वार, आशिष गुप्ता आणि बाबू रिझवी या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे असलेली ज्युपिटर स्कुटर ही मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचं निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनीय दुचाकीसह आणखी ६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या सर्व गाड्या गुन्हे शाखेनं जप्त केल्या. केवळ एका माहितीच्या आधारे संपूर्ण बाईक चोरीचं रॅकेट गुन्हे शाखेनं पकडलं असून गुन्हे शाखेचे पिंट्या थोरवे यांच्या तत्पररेचं यानंतर कौतुक होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT