three injured at samruddhi mahamarg in a accident of car and truck saam tv
क्राईम

Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघे जखमी; दाेघांची प्रकृती गंभीर

samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलतात त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.

संजय जाधव

Buldhana News :

समृद्धी महामार्गावर छाेट्या माेठ्या अपघाताचे (samruddhi mahamarg accident) सत्र सुरुच आहे. आज (गुरुवार) एका कार आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघे जण गंभीर झाले आहेत. प्राथमिक माहितीनूसार ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने भरधाव कार ट्रकवर धडकली. ही धडक इतकी जाेरात हाेती की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. (Maharashtra News)

या अपघाताबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार : समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज 301 जवळ समोर धावत असलेल्या ट्रक चालकाने अचानक लेन बदलली. त्याच्या मागून येणारी भरधाव कार ट्रकवर आदळली.

या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. या तिघांना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलतात त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Best Foods For Kidney: दररोजच्या आहारात 9 गोष्टींचा करा समावेश, तुमची किडनी कधीच खराब होणार नाही!

Yuzvendra Chahal Retirement : भारतीय क्रिकेटपटूचा मोठा निर्णय! फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला; आता कुठून निघणार, कुठे धडकणार?

प्रदीप पूर्णेकर हत्येपूर्वीच्या दोन दिवसांत काय घडलं? राम पूर्णेकरांच्या जबाबातून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT