Thane News Saam Tv
क्राईम

Shocking : भिवंडीत धर्मांतराचा खेळ; मुलींच्या डोक्यावर हात ठेवायचा अन्... अमेरिकेतून आलेल्या तरुणाचं 'अघोरी' कृत्य

Thane News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. अमेरिकन नागरिक जेम्स वॉटसनसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम आणि विदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथे धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.

  • अमेरिकन नागरिकासह तिघे जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

  • हिंदुत्ववादी संघटनांनी हा डाव मोडीस काढला आहे.

  • संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाड्या वस्तीवरील आदिवासी खेडूत्यांच्या अज्ञान व अशिक्षितपणासह गरिबीचा गैरफायदा घेत धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये एका अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ रस्त्यावरील भुईशेत या गावात मनोज गोविंद कोल्हा याचे घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये येशु ख्रिस्तांची प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावातील महिला, पुरुष व लहान मुलमुली यांना प्रार्थनेसाठी जमा करून तेथे आलेले जेम्स वॉटसन व त्याचे साथीदार साईनाथ गणपती सरपे व मनोज गोविंद कोल्हा यांनी आपल्यासोबत आणलेली पुस्तके वाचून दाखवू येशु ख्रिस्तांचे प्रार्थनेचा तसेच ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होते.

यावेळी त्यांच्याकडून हिंदू धर्मावर टीका करीत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुखसमृद्धी लाभेल असे सांगुन हिंदू धर्म बदलण्यासाठी धर्मपरिवर्तन करण्याचे काम करीत होते. तसेच तेथील लहान मुलींच्या कपाळावर हात ठेवून दैवीशक्तीचा वापर करुन त्यांच्यावर उपचार केल्याचे भासवले. ही माहिती स्थानिक नागरिक रविनाथ सावजी भुरकुट यांनी हिंदुत्ववादी संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर त्यांनी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यातील पथकासह घटनास्थळी धाव घेत तेथून जेम्स वॉटसन,साईनाथ गणपती सरपे,जेम्स वॉटसन, मनोज गोविंद कोल्हा यांना ताब्यात घेतले.

चौकशीमध्ये जेम्स वॉटसन हा अमेरिका देशातील नागरिक असून २०१६ मध्ये सुरवातीला टुरिस्ट व्हिसा वर येऊन त्यानंतर व्यावसायिक व्हिसा मिळवून तो भारतात ठाणे येथे वास्तव्यास आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात रविनाथ भुरकुट यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. आणि त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम व विदेशी व्यक्ति अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक एक्सप्रेस, ११ ठिकाणी थांबणार, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

Harley-Davidson Bike: हार्ले डेविडसनचे नवे मॉडेल लॉन्च; नॉनस्टॉप धावणाऱ्या सुपर प्रीमियम बाइकची वैशिष्ट्ये वाचा

Thane : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस या वाहनांना बंदी; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

Sindhudurg: आईच्या फोनवरून मेसेज, भेटायला बोलावलं; धरणात आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT