Tamilnadu Crime News Saam Tv
क्राईम

Crime: नवरा कामाला गेला, समलिंगी पार्टनरसाठी आईकडून ५ महिन्यांच्या बाळाची हत्या; मृतदेहासोबत फोटो काढून पाठवले

Tamilnadu Crime News: तामिळनाडूमध्ये आईने आपल्या पोटच्या ५ महिन्यांच्या बाळाला संपवलं. समलिंगी पार्टनरसाठी तिने हे धक्कादायक कृत्य केले. बाळाच्या हत्येनंतर मृतदेहासोबत फोटो काढला आणि पार्टनरला पाठवला.

Priya More

तामिळनाडूमध्ये एका महिने आपल्या ५ महिन्यांच्या बाळाची हत्या केली. तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील केलामंगलम येथे २ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. बाळाच्या वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे वाटले त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसही चक्रावले. कारण आईनेच आपल्या समलिंगी पार्टनरच्या मदतीने बाळाला संपवल्याचे तपासातून उघड झाले. या प्रकरणी दोघींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिला केलीमंगलमजवळील चिन्नट्टी गावात राहतात. एस भारती आणि तिची समलैंगिक पार्टनर सुमित्रा (२२ वर्षे) अशी आरोपी महिलेंची नावं आहेत. पोलिसांनी सांगितले की, भारतीचे लग्न सुरेश (३८ वर्षे) यांच्याशी झाले होते. त्यांना ५ आणि ३ वर्षांच्या दोन मुली आहेत आणि ५ महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला होता.

भारतीचे सुमित्रासोबत प्रेमसंबंध होते. सुरेशला भारती आणि सुमित्रा यांच्यामध्ये समलिंगी संबंध असल्याचे कळाले तेव्हा त्याला धक्का बसला. यावरून भारती आणि सुरेश यांच्यात भांडण झाले. त्यामुळे त्याच्या धाकट्या बहिणीला मुलांची जबाबदारी घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी सुरेशसोबत झालेल्या भांडणानंतर भारती कुंथुमारनपल्ली गावात तिच्या आईच्या घरी निघून गेली. पण तिच्या आईने तिची समजून काढून तिला परत सासरी पाठवले.

सुरेश आणि कुटुंबातील इतर सदस्य कामावर गेले असता भारतीने आपल्या ५ महिन्यांच्या बाळाची हत्या केली. कामावरून नवरा घरी आल्यानंतर भारतीने त्याला सांगितले की बाळाचा मृत्यू गुदमरून झाला. कुटुंबातील सदस्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि बाळावर अंत्यसंस्कार करत मृतदेह पुरला. पण बाळाच्या वडिलांना बाळासोबत काही तरी चुकीचे घडले असावे असा संशय होता. मंगळवारी सुरेशने पोलिस ठाण्यात धाव घेत मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासातून भारतीने सुमित्राच्या मदतीने आपल्या बाळाची हत्या केली असल्याचे उघड झाले. दोघींनी बाळाच्या हत्येचा आधीच कट रचला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. भारतीने सुमित्राच्या मोबाइलवर एक मेसेज पाठवत हत्येची कबुली दिली आणि बाळाच्या मृतदेहासोबतचा फोटो पाठवला होता. पोलिसांना आरोपींच्या मोबाइलमध्ये भारती आणि सुमित्रा यांचे सोबतचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ सापडले आहेत. पोलिसांनी अटकेनंतर दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra Politics: कालचे वैरी आजचे मित्र? शिंदेसेना आणि ठाकरेंसेना एकत्र येणार? VIDEO

SCROLL FOR NEXT