Maharashtra Crime News saam tv
क्राईम

Dombivli News: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि...! डोंबिवलीतील पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला वेगळं वळण

Maharashtra Crime News: डोंबिवलीतील पोलीस कर्मचारी श्रीराम मिसाळ आत्महत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

संघर्ष गांगुर्डे, प्रतिनिधी

डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ यांच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. या प्रकरणात त्यांच्या पत्नी शिवगंगा शिरसाठ उर्फ शिवगंगा श्रीराम मिसाळ हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे पोलीस दलातही मोठी चर्चा सुरू झाली असून प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय.

श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे पत्नीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

मृताचे भाऊ लक्ष्मण मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीराम आणि शिवगंगा यांचं लग्न २०११ मध्ये झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच शिवगंगा माहेरी गेली आणि त्यानंतर ती सासरी कायमस्वरूपी राहिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच विवाहाच्या दिवशीच हा विवाह मान्य नसल्याचं तिने सांगितल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आलाय.

फिर्यादीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम यांना पत्नीकडून मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पगार, पद आणि नोकरीवरून टोमणे मारणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं तसेच कुटुंबीयांविषयी खोटे आरोप करणं अशा प्रकारांमुळे ते सतत तणावाखाली राहत होते, असा आरोप करण्यात आला आहे. काही वेळा त्यांना घरात प्रवेशही नाकारण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय.

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय

याशिवाय, पत्नीचं एका सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचा संशय श्रीराम यांना होता. या कारणावरूनही पती-पत्नीमध्ये वाद वाढल्याचा दावा करण्यात आलाय. आत्महत्येपूर्वी काही दिवस त्यांनी आपल्या भावाकडे मानसिक त्रासाबाबत वारंवार व्यथा मांडल्याचंही फिर्यादीत म्हटलंय. तसंच आत्महत्येचा इशाराही त्यांनी फोनवर दिल्याचं कथित ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आलाय आहे.

या प्रकरणात ऑडिओ रेकॉर्डिंग, मोबाईलवरील संभाषणं आणि इतर कागदपत्रांसह विविध पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आलेत. फिर्यादीत उल्लेख करण्यात आलेल्या काही व्यक्तींचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीये. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT