Solapur News Saam tv
क्राईम

Solapur News: काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्षांवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

Solapur Latest News: सोलापुरात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहा जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारत नागणे

Solapur Latest News:

सोलापुरात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहा जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुण धवलनगर अकलुज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यात शिरला. त्याने घरात १८ जानेवारीला रात्री १ वाजून ४९ मिनिटाला एन्ट्री केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२१ वर्षीय तरुण बंगलाच्या आवारात शिरल्यानंतर त्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, सतिश पालकर, मयूर माने, हिरा खंडागळे यांच्यासहित इतरांनी त्याला चोर समजून पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणाला जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी उकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

२१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अकलूज पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणी सतीश पालकर आणि मयूर माने या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT