Solapur Ringan Sohala Warkari Viral Video Saam Tv News
क्राईम

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Solapur Ringan Sohala Warkari Viral Video : तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन भक्तिभावाने रिंगणात धावणाऱ्या एका महिला वारकऱ्याला, 'तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का?' असा सवाल करत चक्क चोपदाराने त्या महिलेनं जोरात ढकलून दिलं.

Prashant Patil

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

सोलापूर : तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन भक्तिभावाने रिंगणात धावणाऱ्या एका महिला वारकऱ्याला, 'तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का?' असा सवाल करत चक्क चोपदाराने त्या महिलेनं जोरात ढकलून दिलं. या धक्क्यानं महिला थेट जमिनीवर कोसळली. ही घटना ठाकुरबुवा समाधी येथे पार पडलेल्या तिसऱ्या रिंगण सोहळ्यादरम्यान घडली. जमिनीवर पडलेल्या महिलेनं 'इतकं काय झालं?' असा प्रतिप्रश्न करत चोपदाराच्या उद्धट वर्तनाला विरोध केला. मात्र, विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे पाठीमागून आळंदी देवस्थानचे विश्वस्त मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

वारीसारख्या पवित्र आणि भक्तिभावाच्या सोहळ्यात महिलांशी असा अवमान करणारा आणि अरेरावीचा प्रकार घडणं अत्यंत निंदनीय आहे. या प्रकारामुळे वारीतील शिस्त आणि भक्तीच्या मूळ तत्त्वांना धक्का बसला असून, चोपदाराच्या या वर्तनावर कडक कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होऊ लागला असून यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज ३ जुलै सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचे ऊभे रिंगण पार पडले. हे रिंगण झाल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. दरम्यान, अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि तुळस डोक्यावर घेतलेल्या एका महिला वारकऱ्यास जोरात ढकलून दिले. त्यामुळे, ती महिला वारकरी गोल रिंगण करुन समोर बसलेल्या वारकरी माऊींच्या आंगावर पडली.

विशेष म्हणजे या महिला वारकरी भक्ताच्या डोक्यावरील तुळस पितळाची होती, दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. एवढं होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत, जोरजोराने ओरडत या महिलेशी ते वाद घालत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT