Solapur Crime News Saam TV
क्राईम

Solapur Crime News: MIDC परिसरातून ड्रग्सची तस्करी, तो पैसे पुरवायचा, पोलिसांनी अशी केली अटक?

Crime News: कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त; पैसे पुरवणाऱ्या आरोपीला सोलापूर पोलिसांकडून अटक

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News:

एमडी ड्रग्स प्रकरणी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे. मुंबई, नाशिक आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढत आहे. या प्रकरणी शनिवारी आणखी एका आरोपीला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून 5, मुंबई पोलीस दलाकडून 2 आणि नाशिक पोलिसांकडून 1 असे एकूण 8 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तसेच आणखी आरोपी वाढण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रामा गौडा चंद्रय्या गौडा इडगी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तेलंगणा राज्यातील जहिराबादमधून गौडाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केलीये.

सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रामौळी एमआयडीसी परिसरातून आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गौडा हा सर्व प्रकरणामध्ये पैसे पुरवत होता. अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये.

गौडाकडून या प्रकरणी अधिक माहिती मिळेल तसेच आणखी चार ते पाच जण हाती येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीये. रामा गौडाला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT