Woman Killed Mother-in-Law Saam Tv
क्राईम

Jalna Crime: सासूचा खून केला, मृतदेह गोणीत भरून निघून गेली; निर्दयी सूनेचा प्रताप

Woman Killed Mother-in-Law: जालन्यामध्ये महिलेने आपल्या सासूची हत्या केल्याची घटना घडली. हत्येनंतर सासूचा मृतदेह गोणीमध्ये भरून सून फरार झाली. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यामध्ये सूनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूनेने आधी सासूची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह गोणीमध्ये भरूर ती तिथून पळून गेली. जालना शहरातील भोकरदन नाका येथील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सविता शिनगारे (४५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सविता शिनगारे या जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये सून प्रतीक्षा शिनगारेसोबत राहत होत्या. त्या मूळच्या बीडच्या असून त्या जालन्यामध्ये भाड्याने घर घेऊन राहत होत्या. सविता यांचा मुलगा लातूरमध्ये नोकरी करतो आणि तो त्याच ठिकाणी राहतो. त्यामुळे सविता सूनेसोबत जालन्यात राहत होत्या.

सविता आणि प्रतीक्षा यांच्यामध्ये कौटुंबिक कारणांवरून सतत वाद व्हायचा. याचाच राग मनात धरून प्रतीक्षाने पहाटे सासूची हत्या केली. प्रतीक्षा सासूच्या खोलीत गेली. सासूचे डोकं पकडून भिंतीवर आपटून आपटून तिची हत्या केली. हत्येनंतर तिने सासूचा मृतदेह गोणीत भरला आणि तिथून पळ काढला. प्रतीक्षाचा हा रद्रावतार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रतीक्षाने सासूच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गोणीमध्ये भरला आणि घराबाहेर आणला. मृतदेह जड असल्यामुळे तिला तो घेऊन जाता येत नव्हता. तेवढयात घरमालकाने प्रतीक्षाला पाहिले. तिच्या हालचाली पाहून घरमालकाला संशय आला त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

घरमालकाला पाहिल्यानंतर घाबरलेली प्रतीक्षा सासूचा मृतदेह तिकडेच टाकून फरार झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ते तपास करत आहेत. आरोपी प्रतीक्षा शिनगारेच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची दोन पथक रवाना केली होती. अखेर प्रतीक्षाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. परभणीतून तिला ताब्यात घेण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

SCROLL FOR NEXT