Bihar Shocking News  Saam Tv
क्राईम

Shocking News: सासूसोबत रुग्णालयात गेली अन् बॉयफ्रेंडसोबत फरार झाली

Bihar Police: बिहारमध्ये रुग्णालयात सासूनला घेऊन गेलेली महिला परत घरीच आली नसल्याची घटना घडली. ही महिला रुग्णालयातूनच आपल्या बॉयफ्रेंडसोबत फरार झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

सासूला रुग्णालयात घेऊन गेलेली सून घरी परत आली नाही. रुग्णालयातून ती बॉयफ्रेंडसोबत पळू गेल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. ही घटना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका गावामध्ये घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली. महिलेच्या नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारी महिला आपल्या सासूच्या उपचारासाठी तिला घेऊन दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती. या महिलेच्या सासूवर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान महिला फरार झाली. महिलेच्या नवऱ्याने केवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी महिलेच्या नवऱ्याने गावातील अमरजीत दास याच्यावर आरोप केले आहेत. या व्यक्तीबरोबर आपली बायको पळू गेल्याचा आरोप महिलेच्या नवऱ्याने केला आहे.

१२ मार्चला महिलेच्या सासूची प्रकृती अचानक बिघडली. तिला तात्काळ दरभंगा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आपल्या सासूची देखभाल करत होती. त्याचवेळी ती २२ मार्चला दुपारी अचानक गायब झाली. महिलेच्या नवऱ्याने शोधाशोध केली पण त्याला बायको काही सापडली नाही. बायकोचा फोन बंद लागत असल्यामुळे नवरा चिंतेत आला.

महिलेच्या नवऱ्याने गावात गेल्यानंतर देखील शोधाशोध केली तर त्याला माहिती मिळाली की केवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशनपूर परसा गावातील रहिवासी असलेल्या अजय दास यांचा मुलगा अमरजीत दासने त्याच्या बायकोला फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत महिलेचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

पावसाळ्यात कांदाभजीऐवजी बनवा 'ही' गरमागरम भजी; खाणारेही विचारतील रेसिपी!

SCROLL FOR NEXT