Mumbai Crime News  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: बायकोसोबत एकांत मिळेना, बापाने मुलीलाच संपवलं; मुंबई हादरली

Mumbai Police: मुंबईमध्ये बापाने आपल्या ४ वर्षांच्या मुलीची हत्या केली. गळा दाबून मुलीची हत्या करण्यात आली आणि मृतदेह समुद्रामध्ये टाकून देण्यात आला. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे.

Priya More

मुंबईमध्ये बापाने आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातील ही घटना आहे. बायकोसोबत एकांत मिळत नसल्याने रागाच्या भरात आरोपीने हे धक्कादायक कृत्य केले. या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडालली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसारक, बायकोसोबत एकांत मिळत नव्हता. यामध्ये अडसर ठरणाऱ्या मुलीला बापाने संपवलं. चार वर्षांच्या मुलीची त्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रामध्ये फेकून देण्यात आला. मुंबईतल्या कुलाबा परिसरातील ससून डॉकजवळील समुद्रामध्ये या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी या मृत मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मुलीच्या वडिलांविषयी पोलिसांना माहिती मिळाली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचे वडील देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना या मुलीच्या वडिलांवर संशय आला. मुलीच्या शवविच्छेदन अहवालात देखील गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पथके तयार करून मुलीच्या वडिलांचा शोध सुरू केला. अखेर वरळी परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी पीडित मुलीचा सावत्र बाप आहे.

आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबुल केला. त्याने सांगितले की, त्या ४ वर्षांच्या मुलीमुळे तो बायकोसोबत एकांतामध्ये क्षण घालवून शकत नव्हता. रात्री देखील मुलगी उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असायची. त्यामुळे त्याची सतत चिडचिड व्हायची. याच सर्व रागातून त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली त्यानंतर मृतदेह समुद्रात नेऊन फेकला. या घटनेमुळे अँटॉपहिल परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-Pakistan Match: 'माझा देश माझं कुंकू' मोहीम;भारत-पाक सामन्यावरुन ठाकरे आक्रमक

Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

RBI News : आता EMI चुकला तर फोन होणार बंद, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घट

SCROLL FOR NEXT