Dhule Crime News saam tv
क्राईम

Shocking: लग्नासाठी घरच्यांचा नकार, 4 वर्षांनी पुन्हा भेटले नंतर एकत्रच मृत्यूला कवटाळलं

Dhule Crime News: कुटुंबियांनी लग्नाला विरोध केल्यानंतर एका प्रेमी जोडप्यानं एकाच झाडाला गळफास घेतलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.

  • दोघांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • घरच्यांचा विवाहाला विरोध असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

  • घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.

धुळ्यात एक धक्कादायक घटना घडलीय. एका प्रेमी जोडप्यानं आत्महत्या केलीय. आत्महत्या केलेल्या दोघांनी एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. परंतु त्या दोघांच्या घराच्यांचा त्यांच्या लग्नाला नकार होता.

विशेष म्हणजे ते दोघेही एकाच समाजाचे होते. त्यानंतर दोघांच्या घरच्यांनी त्याचे लग्न दुसऱ्यासोबत लावून दिलं. नंतर चार वर्षांनी ते दोघे भेटले. या दोघांनी गावात असलेल्या एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलाय.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांना अपत्ये आहेत. टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. साक्री तालुक्यातील एका २८ वर्षीय तरुण आणि २५ वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते.

विशेष म्हणजे ते दोघेही एकाच समाजाचे होते. ४ वर्षांपूर्वी दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालं होतं, या दोघांचे सासर देखील एकाच गावाचे होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. दोघांवर शोकाकुल वातावरणात दि.१९ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident : रिंग रोडवर अपघाताचा थरार, अस्थी विसर्जन करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, २ मुलांसहित ७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: अपहरण झालेल्या नागनाथ नन्नवरेच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

Post Office: पोस्ट ऑफिसची खास योजना, महिन्याला जमा करा ५००० रुपये, ५ वर्षांत होईल ५० हजारांचा नफा

Crime : मंदिरात लग्न, मग गर्भपात... महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

Ind Vs Pak: शिवसैनिक आणि जनता भारतीय क्रिकेटपटूंना काळे फासणार; ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांचा थेट इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT